सेतू अभ्यासक्रम व स्वाध्याय उपक्रम अंमलबजावणी संदर्भात शाळा भेट

?️ दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी जि.प.प्रा.शा. रामपुरी (रत्‍नेश्वर) केंद्र गुंज ता. पाथरी जि.परभणी येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी चे अधिव्याख्याता मा. नितीन जाधव सरांनी सेतू अभ्यासक्रम व स्वाध्याय उपक्रम अंमलबजावणी संदर्भात भेट दिली.

? भेटी दरम्यान सरांनी शाळेच्या परिसरात सुरु असलेल्या अभ्यासगटांना भेट दिली व मार्गदर्शन केले.

? वर्ग सातवी च्या गटाला भेट देऊन त्यांना अतिशय सोप्या शब्दात व व्‍यवहारीक उदाहरणाच्या माध्यमातून शेकडेवारी संकल्पना व संबोध स्पष्ट केले.

? त्याच बरोबर सरांनी शाळेतील सेतू अभ्यासक्रम संदर्भात शाळेतील शिक्षकांशी चर्चा करताना त्यांचेही अभिप्राय जाणून घेतले.

? उपस्थित शिक्षकांना सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी,मुलनिहाय नियोजन, विद्यार्थी स्तर निश्चिती बाबत सखोल मार्गदर्शन केले.

? याच वेळेस येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी चे IT विषय सहाय्यक श्री गजानन पामे स्वाध्याय उपक्रम अंमलबजावणी संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.

? यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तसेच श्री होरगुळे सर , श्री रिंगणे सर श्रीमती मुबटे मॅडम, श्रीमती मुळे मॅडम, श्री घाटूळ सर, उपस्थित होते.

? मा. नितीन जाधव सर यांनी सर्व शिक्षकांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देऊन सर्व शिक्षकांचा उत्साह द्विगुणीत केला. धन्यवाद.