प्राचार्य

श्री अनिल संभाजीराव मुरकुटे
            प्राचार्य
जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍था,परभणी

            शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने नियोजनबद्ध व योग्य पद्धतीने कार्य करीत राहणे आवश्यक आहे. या जिल्ह्यातील शाळांमधून घडणारी मुले हीच भविष्यातील केवळ या जिल्ह्याचीच नव्हे तर राज्याची आणि राष्ट्राची सुद्धा संपत्ती आणि शाक्ति आहे. शाळेतून घडणारे उद्याचे नागरिक हे शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम राहतील या दृष्टीने जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, परभणी या संस्थेतील सर्व अधिकारी, विषय सहाय्यक, गट साधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व सर्व स्तरावरील शिक्षण विभागाशी संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय साधून अत्यंत तळमळीचे कार्य करीत आहेत. शासनाच्या शिक्षण विषयक सर्व योजना, सर्व संकल्प, शिक्षण विभागाशी संबंधित कायदे, नियम, सूचना, परिपत्रके व विविध स्तरावरील नियोजन यानुसार शैक्षणिक प्रगतीसाठी कार्य करीत असताना सर्व पर्यवेक्षीत यंत्रणा सोबत घेऊन व सर्व शिक्षक बांधवाना एकत्रित घेऊन पुढे जाणे आवश्यक आहे.यासाठी सर्व शिक्षक संघटना, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी मनःपूर्वक व तेवढ्याच आत्मीयतेने आवश्यक ते सर्व सहकार्य केले तर जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती कधीही आणि कुठेही कमी दिसणार नाही; याची मला खात्री आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मूल या शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे. त्याला किमान पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंत दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेचे सक्षमीकरण करून प्रत्येक मुलाला गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

श्री अनिल संभाजीराव मुरकुटे

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , परभणी

Comments are closed.